आज माझ्या विराचे गुण कसे गाऊ बाई । aaj majhya veerache gun kase gaay baai (Marathi)

आज माझ्या विराचे गुण कसे गाऊ बाई

कुंदलपुर नगरी मध्ये वीर जन्मले ग बाई
कुंदलपुर नगरी मध्ये वीर जन्मले ग बाई
आज माझ्या विराचे गुण कसे गाऊ बाई

चैत्र सुदी तेरस चा तो, दिवस ग होता भारी
त्रिशला आईच्या कुशीत, बाळ झोपले ग बाई
सोन्याच्या पाळण्यात…
सोन्याच्या पाळण्यात ठेवण्याची झाली घाई। आज माझ्या…

शुक्रवार चा दिवस तो, पाळण्यात वीर हसतो
रेशमाच्या दोरीने हो, पिता पाळणा हलवितो
त्रिशला आई झोपविते…
त्रिशला आई झोपविते, गावूनी त्याला अंगाई। आज माझ्या…

स्वर्गातूनी आले बघा, इंद्र आणि इंद्रायणी
आले राज महाराजे आणि त्यांच्या पटराणी
गाव सजला हो झाली…
गाव सजला हो झाली, बारश्याची ही तयारी। आज माझ्या…

राज पाट सोडूनि सारे, दीक्षा अंगीकार हो केली
आयु सार्थ करण्यासाठी, मोह माया सोडूनि दिली
निर्वश आणी निरंकार हो…
निर्वश आणि निरंकार, राहुनी ते जगले बाई। आज माझ्या…

सत्य अहिंसा शिकवण, वीर देवून गेले
जगा आणि जगू द्या हो, सार्थ तुम्ही आम्ही केले
चौविसाव्या तीर्थंकरची हो…
चौविसाव्या तीर्थंकरची प्रतिमा अशी बघा ही। आज माझ्या…