घेऊनि ऐसेची ध्वजा मी हाती । gheuni aisechi dhwaja mi haati (Marathi)

घेऊनि ऐसेची ध्वजा मी हाती

घेऊनि ऐसेची ध्वजा मी हाती,
आले मी विराच्या महोत्सव दिवशी.

जगा जगू द्या, सत्याने वागा, विराची शिकवण अशी.
माँ त्रिश्लेचा कलाजाचा तुकडा
कुठं दिसेनं मला, ग बाई बाई, कुठं दिसेनं मला.
कुठं दिसेना, इथे दिसे ना, इथे दिसेना, तिथे दिसेना
शोधू कुठे, शोधू कुठे, शोधू कुठे.

दिसले ग बाई दिसले, दिसले ग बाई दिसले,
साऱ्या जैनींच्या मनात बसले ग बाई बसले.

चैत्र सुदी तेरस च्या दिवशी,बघुनी सोळा स्वप्नच्या राशी ग बघुनी सोळा स्वप्नाच्या राशी,
जन्माला आला महावीरा,
हा जगमगता तारा ग बाई बाई जगमगता तारा,
जगमगता, जगमगता, जगमगता.

दिसले ग बाई दिसले, दिसले ग बाई दिसले
साऱ्या जैनींच्या मंदिरात दिसले ग बाई दिसले

सत्य अहिंसाचा हा नारा, देऊन गेला माझा महावीरा, देऊन गेला माझा महावीरा,
बारा वर्षाचे तप करुनी,
पावापुरी गाठला ग बाई बाई पावापुरी गाठला,
पावापुरी, पावापुरी, पावापुरी.

दिसले ग बाई दिसले, दिसले ग बाई दिसले
साऱ्या जैनींच्या अंतरे दिसले ग बाई दिसले

आले त्रिशला आईच्या गर्भात, रूप घेतले तीर्थंकरात,
सिद्धार्थ राजा आनंदी झाले,
वीर आले हो जगात, ग बाई बाई वीर आले हो जगात,
वीर आले, महावीर आले, वीर आले.

दिसले ग बाई दिसले, दिसले ग बाई दिसले
साऱ्या जैनींच्या मनात दिसले, ग बाई दिसले

अंतरज्ञानी आहे हो वीर, वर्धमानाचे झाले महावीर
चोवीसवा अवतार जैनांचा आधार
जगाचा केला उद्धार, ग बाई बाई जगाचा केला उद्धार
केला उद्धार, केला उद्धार, केला उद्धार.

दिसले ग बाई दिसले, दिसले ग बाई दिसले
सोन्याच्या हो पाळण्यात दिसले ग बाई दिसले.
सोन्याच्या हो पाळण्यात बसले ग बाई बसले.
सोन्याच्या हो पाळण्यात बसले ग बाई बसले.

1 Like