एका सिंहापुढे दोन मुनि बैसले , सारे भवांतर त्याला सांगू लागले … **
** हो… S S
एका सिंहापुढे दोन मुनि बैसले , सारे भवांतर त्याला सांगू लागले …
जंगलात ऐकेवेळी , पुरूरवा होऊनी भिल्ल,
अभक्ष्य खाऊनिया नित्य , लोकनिंद्य होती चाल … २
तेथे सागरसेन मुनिराज भेटले, सारे भवांतर त्याला सांगू लागले …
हो… S S
एका सिंहापुढे दोन मुनि बैसले , सारे भवांतर त्याला सांगू लागले …
नको नको मारू पक्षी , तुझ्यापरी त्याचा जीव ,
धर्मबोध होता तुजला , जीवदया उपजे भाव ,
त्यांना देवलोकी दिव्य सौख्य लाभले , सारे भवांतर त्याला सांगू लागले …
हो… S S
एका सिंहापुढे दोन मुनि बैसले , सारे भवांतर त्याला सांगू लागले …
भाग्यवान राजा होता आदिनाथ अयोध्येचा
श्रेष्ठ अशा वंशामध्ये होऊनिया नातू त्यांचा
पुन्हा मानकषायाने पाप बांधले , सारे भवांतर त्याला सांगू लागले …
हो… S S
एका सिंहापुढे दोन मुनि बैसले , सारे भवांतर त्याला सांगू लागले …
जन्म मरण होता फेरी कधी त्रस स्थावर जीव,
किती दुःख ते सांगावे , नाही अंत त्याचा ठाव,
परी सम्यकत्वाचे नेत्र नाही लाभले, सारे भवांतर त्याला सांगू लागले …
हो… S S
एका सिंहापुढे दोन मुनि बैसले , सारे भवांतर त्याला सांगू लागले …
तीन दिवस उरले आता शेष तुझे आयुकर्म
क्रूर भाव सोडुनी हिंसा जीव दया पाळी धर्म ,
तुझ्या संसाराचे चक्र सारे संपले , सारे भवांतर त्याला सांगू लागले …
हो… S S
एका सिंहापुढे दोन मुनि बैसले , सारे भवांतर त्याला सांगू लागले …